*पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविदयालयातील डॉ. शिवशंकर कोंडूरू यांना पीएच.डी. प्रदान*
प्रगत अभियांत्रिकी आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत, डॉ. कोंडूरू शिवशंकर यांनी वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), वेल्लोर येथून पॉवर सिस्टीम्स या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
डॉ. शिवशंकर यांचे संशोधन आधुनिक ऊर्जा व्यवस्थापन, वीज वितरणातील कार्यक्षमता तसेच स्मार्ट ग्रीड प्रणालींच्या उन्नतीवर केंद्रित होते. त्यांच्या संशोधनातून विद्युतप्रणाली क्षेत्रात नावीन्यपूर्ण दिशा प्राप्त झाली असून, भविष्यातील ऊर्जा गरजांसाठी हे संशोधन मोलाचे ठरणार आहे.
सध्या डॉ. कोंडूरू शिवशंकर हे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचा गौरव केला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

