पंढरपूर सिंहगडच्या गणेश चव्हाणची ४ कंपनीत निवड सिव्हील इंजिनियरींगमध्ये नोकरीच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध*

 *पंढरपूर सिंहगडच्या गणेश चव्हाणची ४ कंपनीत निवड सिव्हील इंजिनियरींगमध्ये नोकरीच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध*



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हील विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेला नेमतवाडी, ता.पंढरपूर येथील गणेश गोरख चव्हाण यांची ४ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभाागाचे विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिव्हील इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच गणेश गोरख चव्हाण यांची पायेनियर फाउंडेशन इंजिनियरींग प्रा.लि. (वार्षिक पॅकेज ३ लाख ), ट्र रियालिटी, मुंबई (वार्षिक पॅकेज ३.२५ लाख ), फोरट्रेस इनफ्राकॉन प्रा.लि., मुंबई (वार्षिक पॅकेज ३ लाख ), इंडोवन्स प्रा. लि.(वार्षिक पॅकेज ३ लाख ), येथे कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे. इंडोवन्स प्रा. लि. पुणे कंपनीत गणेश हा जून 2025 मध्ये रुजू झाला आहे. 


इंडोवन्स पुणे ही कंपनी २००३ मध्ये स्थापन झााली असून सिव्हील मधील डिझाईन विभागात स्टॅडप्रो, रिव्हेट, ॲटो कॅड इ. सेवा प्रदान करते. गणेशची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अमोल कांबळे आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad