*पंढरपूर सिंहगडच्या उमामा बेद्रेकरची ३ कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्टॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पंढरपूर येथील उमामा नओमन बेद्रेकर यांची ३ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्टॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच उमामा बेद्रेकर हिचे क्वॉलीटी क्युओक्स (वार्षिक पॅकेज 2.५ लाख), कॅपजेमीनी (वार्षिक पॅकेज 4 लाख), कॉग्नीझंट ( वार्षिक पॅकेज ४ लाख) आदी 3 कंपनीत निवड झाली असून उमामा बेद्रेकर हि कॉग्नीझंट या कंपनीमध्ये रुजू होणार आहेत.
कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९९४ साली झााली असून मुख्यालय अमेरिकेतील टेनेकला येथे आहे. या कंपनीचे भारतामध्ये अनेक ठिकाणी कार्यालये असून ३,५०,००० पेक्षा जास्त अभियंता कार्यरत आहेत. ही कंपनी पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील सर्व शाखेतील विदयार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटसाठी वर्षातून दोन वेळा उपलब्ध होते.
अशा या कंपनीत उमामा बेद्रेकर हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इलेक्टॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

