पंढरपूर सिंहगड मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन..*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन..*



जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर मध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न झाली असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करंडे यांनी दिली. सध्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने कॉलेजमधील प्रथम वर्ष विभागातील 370 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करंडे यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली यावेळी प्रथम वर्ष अभियांत्रिकी चे विभाग प्रमुख डॉ.अनिल निकम, डॉ. संपत देशमुख,डॉ. दीपक गानमोटे, डॉ. अतुल आराध्ये, प्रा. निशा करांडे,

प्रा. शिवाजी पवार, प्राध्यापक अभिजीत सवासे, प्रा. संतोष बागल, प्रा. अक्षय सावंत, प्रा. अतुल घोंगडे, प्रा. श्रीपाद घोंगडे, प्रा. संध्याराणी शिंदे, प्रा. ऋतुजा साबळे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये 110 पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणा संबंधी विविध विषयावरती प्रेझेंटेशन दिले.  

या स्पर्धेमध्ये प्रथम वर्ष विभागामधील कु. प्रगती लक्ष्मण शेंडे आणि कु.पायल विठ्ठल लोखंडे यांनी प्रथम क्रमांक, कु.भक्ती उत्तम गवळी आणि कु. प्रतीक्षा उत्तम सुर्वे यांनी द्वितीय क्रमांक तर कु. धनलक्ष्मी श्रीमंत करे आणि कु. निवेदिता संजय पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला.त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य आणि सर्व शिक्षक व शिक्षित तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad