स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्राध्यापकांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव 'बेस्ट पेपर' पुरस्काराने केले सन्मानित



स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्राध्यापकांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव


'बेस्ट पेपर' पुरस्काराने केले सन्मानित



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामधील प्राध्यापकांनी तिरुअनंतपुरम (केरळ) मधील मार बॅसिलिओस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये दि. २९ ते ३१ मे २०२५ या दरम्यान आयोजित केलेली दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद ‘अप्लाइड मेकॅनिक्स अँड ऑप्टिमाइझेशन (आयसीएमइओ-२०२५)’ मध्ये शोधनिबंधाचे सादरीकरण केले. परिषदेमध्ये त्यांच्या शोध निबंधाची ‘बेस्ट पेपर’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि सर्व प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला. अशा पुरस्कारामुळे स्वेरीतील प्राध्यापकांना सातत्याने संशोधन करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळत आहे, हे मात्र नक्की !

           ‘नुमेरिकेल इन्वेस्टीगेशन ऑफ फ्लुइड-स्ट्रक्टर इन्टेरॅक्शन इन ए वाल्व-लेस माइक्रोपंप अँड इट्स परफॉर्मन्स फॉर विस्कस फ्लूइड्स’ या शोधनिबंधासाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. दिग्विजय रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, प्रा. सचिन गवळी व प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजितसिंह गिड्डे यांना 'बेस्ट पेपर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या शोधनिबंधात नोझल-डिफ्यूझर आधारित वाल्व-लेस मायक्रोपंपचे सॉफ्टवेअर वापरून संख्यात्मक विश्लेषण करण्यात आले. या पंपामध्ये विविध प्रकारच्या द्रवांसह (जसे की अॅसिटोन आणि प्रोपेनॉल) चाचण्या घेण्यात आल्या. अॅसिटोनने सर्वाधिक प्रवाह दर दिला, तर प्रोपेनॉलने सर्वात कमी. यावरून द्रवाच्या विस्कोसिटीचा कार्यक्षमतेवर होणारा प्रभाव स्पष्ट झाला. पंपाच्या डाएफ्रामवरील ताण लवचिक मर्यादेतच असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे अशा पंपांचा उपयोग औषध वितरण प्रणालीसाठी योग्य आहे. या उल्लेखनीय यशामागे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण भोसले, संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. अमरजित केने, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा महत्वाची ठरली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण टीमचे स्वेरी व्यवस्थापनातील सर्व विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.