फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी ५ विद्यार्थांची ट्रयुमेडस् कंपनीत निवड*

 *फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी ५ विद्यार्थांची ट्रयुमेडस् कंपनीत निवड*



सांगोला: प्रतिनिधी


फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला येथील अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या ५ विद्यार्थ्यांची मुंबई येथील ट्रयुमेडस् या नामांकित कंपनीमध्ये "फार्मासिस्ट कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह" या पदासाठी निवड झाली असल्याची माहिती फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. संजय बैस यांनी दिली.

 फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह मध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. या ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह मधुन फर्दीन मुलाणी, रोहन मोरे, सियान शेख, निशिगंधा माने आणि रूपाली शिनगारे यांची निवड करण्यात आली.

  हि निवड प्रक्रिया ट्रयुमेडस् कंपनीच्या एच. आर. कु. श्वेता शुक्ला व पंकज कुमार यांनी स्क्रिनिंग इंटरव्ह्यू, तांत्रिक मुलाखत घेऊन निवड केली.

  विद्यार्थ्यांना उद्योग क्षेञात संधी उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करिअरची संधी उपलब्ध झाली आहे.

  विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. संजय बैस, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. चेतन पतंगे, प्रा. श्रीनिवास माने महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.