सांगोला फॅबटेक मध्ये "आर्डिनो अँड आयओटी" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न*

 *सांगोला फॅबटेक मध्ये "आर्डिनो अँड आयओटी" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न*




सांगोला: प्रतिनिधी


फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार दिनांक २७ व २८ मे २०२५ या कालावधीत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.

    या कार्यशाळेची सुरुवातीस व्याख्याते रोहित दणके, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, स्टुडंट डिन डाॅ. संजय पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड आदींच्या सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान व्याख्याते रोहित दणके यांचे प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  

    या कार्यशाळेत रोहित दणके यांनी "आर्डिनो" प्रोसेसचे मुलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना दिले. याशिवाय प्रात्यक्षिकच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. दरम्यान या कार्यशाळेत हार्डवेअर आणि साॅफ्टवेअर अशा विविध प्रोग्रॅमिंगचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये प्रकल्पाच्या संबधित मार्गदर्शन करण्यात आले. नवनवीन टेक्नॉलॉजी आणि साधने याशिवाय मार्गदर्शन केले.

   या कार्यशाळेचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागा द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले ४० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

    हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. हणमंत मल्लाड, प्रशांत गोडसे सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेचा सुञसंचलन प्रा. रूपाली बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. विजय पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad