पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोकसेवेसाठी आपले जीवन व्यतीत केले. - डॉ. यशपाल खेडकर स्वेरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोकसेवेसाठी आपले जीवन व्यतीत केले. - डॉ. यशपाल खेडकर 


स्वेरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी



पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी भारताच्या संस्कृतीचा वारसा असणारी अनेक मंदिरे व नदीघाट यांचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे भारतीय धर्म संस्कृतीचे जतन होण्यास मोलाची मदत झाली तसेच अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी त्यांनी धर्मशाळांचे बांधकाम केले. तत्कालीन भारतीय समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी व महिलांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी धाडसी निर्णय घेतले. रयतेचे राज्य व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले स्वप्न त्यांनी सत्त्यात उतरवले. एकूणच एका साम्राज्याची महाराणी म्हणून कार्य करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोकसेवेसाठी आपले जीवन व्यतीत केले.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी केले. 

       गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. खेडकर हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत होते. प्रारंभी स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते व नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात निवड झालेले स्वेरीचे माजी विद्यार्थी मिनाक्षी रोंगे, शुभम शिंदे व तेजश्री लेंडवे यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. खेडकर पुढे म्हणाले की, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तुत्वाचा हुंकार आज ३०० वर्षानंतरही ऐकू येतो. यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून आपल्या सोलापूर विद्यापीठाला देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे.’ असे सांगून त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विशाल कार्यातील महत्वाचे बाबी सांगितल्या. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने बी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जे मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. एन.व्ही.कौटकर, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद, सिव्हील इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. एस.पी.पाटील, एम.बी.ए. विभागाचे प्रमुख डॉ. के.पी. गलानी, रजिस्ट्रार आर.जी. झरकर, प्रा. पूजा रोंगे, प्रा. एस. एम.खोमणे, प्रा. यु.एल. अनुसे, इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी प्रवेशासाठी आलेले पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad