माथेफिरू प्रशांत कोरटकर वर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अन्यथा रस्त्यावर उतरू-सचिन जगताप*

 *माथेफिरू प्रशांत कोरटकर वर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अन्यथा रस्त्यावर उतरू-सचिन जगताप*




प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे.राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन मा.मुख्यमंत्री यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिपक पाटील यांचेकडे देताना सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,सतीश चांदगुडे-जि.संघटक,सचिन खुळे-ता.कार्याध्यक्ष,नितीन मुळे-ता.संघटक,विलास कोठावळे-विभागप्रमुख मसेसं,पपेश पाटील-शहराध्यक्ष मसेसं, योगेश मुळे-शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड,नवनाथ रेपे,महावीर वजाळे,महेंद्र सोनवणे-बहूजन मुक्ती पार्टी,दादासाहेब देशमुख,सुनील भोसले,विनोद थोरात,अजय गायकवाड-तालुकाध्यक्ष का.आ,अविनाश नांगरे,सुदर्शन डांगे,सुरज देशमुख,महेश देशमुख,कार्तीकराज दळवी,रणजित क्षीरसागर,कृष्णा फाळके-उपाध्यक्ष मसेसं,संतोष गायकवाड,अतुल अनपट,विजय काळे-सदस्य मसेसं,औदुंबर तपकीरे,संजय देशमुख,बाळासाहेब पवार-शहराध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,गणेश कुंभार,सुनील ढवळे,भैय्या मुळे,दादासाहेब भोसले-कार्याध्यक्ष मसेसं,उमेश जगताप,प्रशांत गायकवाड ई उपस्थित होते*

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad