ज्या विद्यमान आमदारांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडले तिथे सर्वसामान्य जनतेचे काय होणार--अनिल सावंत
कोर्टी येथे प्रचार सभा संपन्न तर एक विश्वासू,हक्काचा माणूस म्हणून आपण मला मतदान करण्याचे केले आवाहन
पंढरपूर प्रतिनिधी:
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस यांच्यामध्ये विचारांचे हेवेदावे मागेपुढे झाले असून यामध्ये मतदारांना संभ्रम होऊ नये यासाठी काल पत्रकार परिषद घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे साहेबांनी सविस्तर आपल्याला माहिती दिली आहे.आणि सर्व पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केलेला आहे.आपला विरोधक फक्त आणि फक्त भाजप पक्ष आहे आणि विद्यमान आमदार आहेत. गतवेळी दोन वर्ष दोन्ही मतदारसंघांमध्ये पंढरपूर असेल मंगळवेढा असेल या मतदारसंघांमध्ये गाव बैठक घेऊन प्रचार केला आणि निवडणुकी पुरती आश्वासने दिल्याने त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना मतदान केले. पण त्यांनी काय केले. जेवढा निधी आणला त्याच पद्धतीचा विकास झालाय का नाही हे माझ्यापेक्षा आपल्या लोकांना अधिक तरुण पिढीला तुमच्यासारख्या समोर बसलेल्या मातांना भगिनींना चांगलं माहिती असल्याचे प्रतिपादन उमेदवार अनिल सावंत यांनी केले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची कोर्टी या गावांमध्ये प्रचार सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना सावंत ते म्हणाले की, ज्याप्रमाणे त्यांनी पक्षातील लोकांना,कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जसे वऱ्यावरती सोडले तसे एवढेच सांगतो की, विशेष तुम्हाला वाऱ्यावरती कधीही सोडणार नाही. आपले सहकारी मत मागतायत फक्त आणि फक्त वडिलांचे कृपा आशीर्वादामुळे जनता तुम्हाला फिरकू देत आहे जो व्यक्ती दोन दोन तीन वर्ष दोन दोन महिने तीन-चार महिन्यात या मतदार संघामध्ये ज्यांचे काम नाही अशा व्यक्ती वरती कोण विश्वास ठेवणार पण आपण एक सहकारी पक्षाचे लोक आहोत येणाऱ्या काळामध्ये त्याची मदत आपल्यालाच होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची काय काम नाही. या सर्वांचा विचार करता नेते मंडळींनी साहेबांकडे माझी उमेदवारी मागितली असता त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली असून शेवटी या जनतेचे व भागातील लोकांचे साहेबांच्या वरती प्रेम बघता हा विजय फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा असून मला मतदान म्हणजे शरद पवार साहेबांना मतदान महाविकास आघाडीला मतदान विकासाला मतदान आहे.
त्यामुळे एक विश्वासू माणूस, एक हक्काचा माणूस म्हणून आपण मतदान करावं आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला मतदान करा. या भागात गेली पंधरा वर्षे झालं साखर कारखाना चालवतो माझ्यापासून मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही तालुक्यांमध्ये सर्व शेतकरी तसेच जनतेचा चांगला सहवास असून आपले प्रश्न सोडवण्यासाठी माझे घर पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यात साखर कारखाना असल्याने सर्वांना कधीही मी उपलब्ध होणार आहे.
येणाऱ्या काळात मतदारसंघांमध्ये चांगले हॉस्पिटल्स,शाळा कॉलेजेस,बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कंपन्या रस्ते,शेतकऱ्यांसाठी पाणी,शहरांमध्ये असलेल्या गटारांची असुविधा या सर्व समस्यांवरती काम करण्याची एक संधी मला द्या त्या संधीचे सोने करून मी दाखवीन. त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मला भरघोस मतांनी निवडून द्या व तुमच्या लोकसेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन मतदारांना केले.
यावेळी कोर्टी गावातील तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-०-