पंढरपूर ~मंगळवेढा मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध - अनिल सावंत



पंढरपूर ~मंगळवेढा मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध - अनिल सावंत 

पंढरपूर प्रतिनिधी -



पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या पाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करण्याची गरज आहे आणि याबाबत मी सर्वप्रथम जातीने लक्ष देऊन काम करेल असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी संपर्क दौरा व पदयात्रा या निमित्ताने केला. संपर्क दौरा व पदयात्रा या निमित्ताने महमदाबाद शेटफळ, लक्ष्मी दहिवडी, लेंडवे चिंचोळे , गणेशवाडी, अकोले आणि कचरेवाडी या गावांना भेट दिली. गावकऱ्यांशी चर्चा करत असताना सांगितले की पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या विकासासाठी परिवर्तनाचे ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत.  या भागातील पाणी प्रश्न दूर करून या भागाचे नंदनवन करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला. 


यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते 

एकंदरीत अनिल सावंत यांना मंगळवेढा व पंढरपूर भागातून मिळणारा प्रतिसाद व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती यावरून ग्रामस्थांचा पाठिंबा दिसून आला. 


येत्या निवडणुकीत असंच सहकार्य करून ' तुतारी वाजवणारा माणूस ' या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन अनिल सावंत यांनी ग्रामस्थांना केले. 


 ' विठ्ठलाचा तू वारकरी, विधानसभेचा तू मानकरी ' अशा प्रकारच्या घोषणा देऊन सर्व ग्रामस्थांनी आपला पाठिंबा अनिल सावंत यांना दर्शवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.