पंढरपूर सिंहगडच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*

 *पंढरपूर सिंहगडच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा बुधवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.

    या मेळाव्याची सुरुवात पालक प्रतिनिधी संजय कोळवले, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने झाली. 

   या मेळाव्यात पालक प्रतिनिधी संजय कोळवले यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

   यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट बद्दल आढावा सादर केला.

   दरम्यान पालक राजेंद्र डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र डोंगरे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सुसंवाद महत्त्वाचा आहे. पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज हे गुणवत्तेत उत्कृष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी सिंहगड कॉलेज मध्ये उपलब्ध होत असल्याचे मत राजेंद्र डोंगरे यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.

    या मेळाव्यात प्रा . नामदेव सावंत यांनी विभागाचा शैक्षणिक आढावा सादर केला. यादरम्यान कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.   

  हा मेळावा यशस्वी 

करण्यासाठी पालक मेळावा प्रतिनिधी प्रा. उदयकुमार फुले, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमित इंगोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. उदयकुमार फुले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad