माहिती अधिकार जनतेशी जवळीक साधणारा एकमेव कायदा- डाॅ. कैलाश करांडे* *पंढरपूर सिंहगड मध्ये "माहिती अधिकार दिन" उत्साहात साजरा*

 *माहिती अधिकार जनतेशी जवळीक साधणारा एकमेव कायदा- डाॅ. कैलाश करांडे*


*पंढरपूर सिंहगड मध्ये "माहिती अधिकार दिन" उत्साहात साजरा*



पंढरपूर: प्रतिनिधी 



महाराष्ट्र शासनातर्फे २८ सप्टेंबर हा दिवस 'माहिती अधिकार दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. याच अनुशंगाने कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोटी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित व्हावी यासाठी माहिती अधिकार २००५ समोर आला. एकीकडे शासन प्रणाली व सर्व कागदपत्रे आपण नियम अधिकाऱ्यामार्फत राबवतो. जनतेला आवश्यक असलेली माहिती विहित नमुन्यातील अर्ज केल्यानंतर मिळते यामुळे शासकीय कामकाजात थोड्याफार प्रमाणात पारदर्शकता येते. माहीती अधिकार कायद्याचे जनतेकडून पालन केले जाते. माहिती अधिकार जनतेशी जवळीक साधणारा एकमेव कायदा असल्याचे मत डाॅ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.

      या कार्यक्रमात उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. चंद्रकांत देशमुख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, प्रा. गणेश लकडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad