पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची "वर्ली" कंपनीत निवड* ○ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज ५.१५ लाख: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची "वर्ली" कंपनीत निवड*


○ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज ५.१५ लाख: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड 



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच ७ विद्यार्थ्यांची वर्ली प्राइवेट लिमिटेड कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असतानाच पंढरपूर येथील कुमारी आर्या अमर आराध्ये, सुमेधा त्रिविक्रम गोहाड, निकिता यशवंत कुलकर्णी, निकिता विठ्ठल देठे, अढेगाव (ता. माढा) येथील दिपाली हरिदास निकम, निमगाव (ता. इंदापूर) नेहा अभिजित काळे, तुलसी (ता. माढा) येथील सिद्धेश्वर दत्तात्रय मोरे आदी ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ५.१५ लाख पगार मिळणार आहे.

   वर्ली प्राइवेट लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय ऑस्ट्रेलिया मध्ये असुन भारत देशातील प्रमुख कार्यालय मुंबई येथे आहे. हि कंपनी बांधकाम, फॅब्रिकेशन, प्रकल्प वितरण, तंत्रज्ञान उपक्रम, डिजिटल धोरण, कन्सल्टींग, खरेदी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, डेटा वापर आदी क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे. या कंपनीचे कार्य ४५ देशांमध्ये आहे. अशा कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाल्याने त्यांना इतर देशांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

वर्ली प्राइवेट लिमिटेड कंपनीत ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad