अरण येथे होणा-या सोहळ्याचे ऐतिहासिक साक्षीदार व्हा-सोमनाथ राऊत* *अरण येथे वास्तू शिल्प भूमी पूजन सोहळा*

 *अरण येथे  होणा-या सोहळ्याचे ऐतिहासिक साक्षीदार व्हा-सोमनाथ राऊत*


*अरण येथे  वास्तू शिल्प भूमी पूजन सोहळा*



सांगोला: प्रतिनिधी 


श्री संत शिरोमणी सावता महाराज श्री क्षेत्र अरण येथे उद्या रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी अरण येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन महाराष्ट्रातुन सावता भक्तांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष समाजभूषण सोमनाथ राऊत यांनी केले आहे.



  अरण येथे रविवार दि ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भक्त निवास व वास्तू शिल्प भूमिपूजन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ, गृह व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य अतुल सावे, खासदार अमोल कोल्हे सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीती मध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.

श्री संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट वतीने भक्त निवास भूमिपूजन व बांधकाम पूर्ण होत आहे सदरील भक्त निवास हे सावता महाराज यांच्या कार्यावर आधारित वास्तू शिल्पावर आधारित असेल या मेळाव्यास महाराष्ट्रातील तमाम सावता भक्तांनी उपस्थित रहावे या कार्यक्रमाचे आयोजक संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार यांनी केले आहे.

तरी महाराष्ट्रामधील तमाम सावता महाराज भक्तांनी बहुसंख्येने या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन महारष्ट्र राज्य माळी समाज महासंघाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.