*'पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात "एनालीसिस अँड डिझाईन ऑफ आरसीसी बिल्डिंग युजींग ई टॅबस्" या विषयावर कार्यशाळा संपन्न.*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी-पंढरपूर येथील सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "एनालीसिस अँड डिझाईन ऑफ आरसीसी बिल्डिंग युजींग ई टॅबस्" या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली. या कार्यशाळेत ई टॅबस् हे सॉफ्टवेअर वापरुन स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुमजली इमारतींची संरचना (डिजाईन) व त्याचे आर सी सी डिझाईन च्या योग्यतेची पडताळणी करण्याविषयीची कार्यशाळा हि २ ते ६ जुलै २०२४ या कालावधीत संपन्न झाली, या कार्यशाळेसाठी कॅडडेस्क पुणे येथील श्री पराग देशमुख हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभले, त्यांनी विद्यार्थ्यांना आरसीसी इमारतीची संरचना सॉफ्टवेअर मध्ये करून त्याची भूकंप, वादळ या परिस्थितीमध्ये ती इमारत कशी टिकली पाहिजे याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या सॉफ्टवेअरच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरसाठी खूप फायदा होईल.
सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यशाळा समन्वयक प्रा. गणेश लकडे, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनेतून आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळे दरम्यान २३ विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरीत्या १० मजली आर. सी. सी. इमारतींचे मॉडेलिंग, ऍनालिसिस व डिजाईन तयार केले. हा कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.