पंढरपूर सिंहगड मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

 *पंढरपूर सिंहगड मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा*



पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी (ता.पंढरपूर) मध्ये शुक्रवार दिनांक २१ जुन २०२४ रोजी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून "आंतरराष्ट्रीय योग दिवस" साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. योगाचे महत्त्व अशा प्रकारे वाढत आहे की केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जात असल्याचे मत योग शिक्षक दत्तात्रय राजभोज यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.



 हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक शिक्षक प्रा. चंद्रकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे योग शिक्षक दत्तात्रय राजभोज यांचा उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात योग शिक्षक दत्तात्रय राजभोज यांनी योगाचे प्रकार सांगुन महत्व उपस्थितांना सांगण्यात आले.

   या कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. दिपक गानमोटे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचारीवर्ग सहभागी झाले होते. 


फोटो ओळी पंढरपूर सिंहगड मध्ये योग शिक्षक दत्तात्रय राजभोज यांचा सत्कार करताना डाॅ. स्वानंद कुलकर्णी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.