पंढरपूूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*

 *पंढरपूूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

 या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे, पालक प्रतिनिधी प्रा. महादेव जेधे, प्रा. अंजली चांदणे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी स्क्रीन द्वारे उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्या समोर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचा शैक्षणिक वार्षिक आढावा मांडला.

 दरम्यान पालक प्रतिनिधी प्रा. महादेव जेधे यांचे पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे हस्ते स्वागत करण्यात आले.

   यादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलाश करांडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, पालक प्रतिनिधी प्रा. महादेव जेधे यांनी मनोगत व्यक्त केले.

  या मेळाव्यात पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या कुमारी दिपाली राजकुमार सुडके सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील इतर विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपञ व भेट वस्तु देऊन सन्मान करण्यात आला.

   हा मेळावा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अंजली चांदणे, प्रा. दत्तात्रय कोरके सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.