पंढरपूर सिंहगड मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त "मतदान जागृती अभियान" संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त "मतदान जागृती अभियान" संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त एसव्हीईईपी कार्यक्रम अंतर्गत "मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना" या विषयावर मंडल अधिकारी विजय शिवशरण यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

  ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्व साजरा करण्यात येत असतो. या दिनाचे औचित्य साधून सिंहगड कॉलेज व सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानतून 

 एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळेस मंडल अधिकारी विजय शिवशरण यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.



  यादरम्यान बोलताना विजय शिवशरण म्हणाले, मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी आपल्या घरातील तसेच आजुबाजूला १८ वर्षे पुर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव अर्ज भरून आपल्या गावातील तलाठी अथवा तहसील कार्यालय जमा करावे. जर आपले मतदान यादीत नाव चुकले असेल तर ते नाव दुरूस्त करून घेता येते. यासाठी तहसील कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. नवीन ओळखपत्र काढण्यासाठी सुद्धा अर्ज दिल्यानंतर नवीन ओळखपत्र भेटते. आपल्या गावातील बी एल ओ, तलाठी अथवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज उपलब्ध आहेत. मतदान नाव नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. याचा फायदा तरुणांनी घेणे आवश्यक असल्याचे मत विजय शिवशरण यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, कविता आदलिंगे, प्राजक्ता कुलकर्णी, तृप्ती कदम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी श्रद्धा कुलकर्णी हिने केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad