पंढरपूर सिंहगडच्या वतीने राष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा*

 *पंढरपूर सिंहगडच्या वतीने  राष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा*



पंढरपूर; प्रतिनिधी 



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर आष्टी गावामध्ये चालू असुन २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय साक्षरता दिवसाचे औचित्य साधून आष्टी गावातून प्रभात फेरी काढून साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

   यादरम्यान प्रथम सत्रामध्ये गावतून प्राभात फेरी काढून जनजागृती केली व आष्टी ग्रामस्थातील १८ वर्षातील तरुणांना मतदान नाव नोंदणी बद्दल जागृतकरण्यासाठी प्रयत्न केला त्यासाठी पूर्ण आष्टी गावात प्रभात फेरी काढून घोषणाच्या माध्यमातून मतदाना बद्दल जनजागृती करण्यात आली प्रभात फेरी मध्ये नूतन विद्यालायाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.

 याचबरोबर मतदानाची गरज पटवून देण्यासाठी प्रयत्न केला, यामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सहभागी झाले होते. जनजागृती प्रभात फेरी त्यासंदर्भात माहिती व मतदानाची गरज पटवून देण्यासाठी आष्टी गावचे सरपंच उपसरपंच व ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी वर्ग त्याच बरोबर  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले,  रासेयो समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, यासह एनएसएस क्लब प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, सेक्रेटरी अथर्व कुराडे विभागीय विद्यार्थी प्रतिनिधी नाना वाघमारे, के. टी. नरळे, ए .ए. चौगुले, एस. के. पांधे, ए. बी. नायकल, पी. एम. रुपनर, टी. एस. खाांडेकर, सी. एल. मासाळ, एस. डी. आसबे,आर. एम .पठाण, एस. पी. कापले, व्ही. व्ही. कंडरे, एच. एच. शिंदे, एस. व्ही. अवताडे, पी. डी. देवराम, एस. ए. भिवरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व ग्रामपंचायत आष्टीसह ग्रामस्थ परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad