पंढरपूर सिंहगड मधील अनुजा पाटील आणि आकांक्षा पवार यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार*

 *पंढरपूर सिंहगड मधील अनुजा पाटील आणि आकांक्षा पवार यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार*



पंढरपूर: प्रतिनिधी


झेप संघटना द्वारे जागतिक डिजिटल डीटाॅक्स दिवसाचे औचित्य साधून "तंत्रज्ञान, मोबाईल आणि इंटरनेट" यांचे मनावर होणारे फायदे आणि दुष्परिणाम या विषयावर ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कुमारी अनुजा पाटील हिने द्वितीय तर कुमारी आकांक्षा पवार हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   जागतिक स्तरावरील झेप संघटनेने जागतिक डिजिटल डीटाॅक्स दिवसानिमित्त "डिजिटल डीटाॅक्स काळाची गरज या स्वरूपात स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत स्पर्धकांनी स्वतःचे विचार नाटक, कविता, भारूड, प्रार्थना आदी विषयांवर विचार व्यक्त करायचे होते. यातील नाटक स्वरूपात पंढरपूर सिंहगडच्या आकांक्षा पवार हिने "तंत्रज्ञान, मोबाईल आणि इंटरनेट" यांचे मनावर होणारे फायदे आणि दुष्परिणाम विचार व्यक्त केले होते.

    आंतरराष्ट्रीय डिजिटल डीटाॅक्स काळाची गरज या स्पर्धेचे बक्षीस वितरण हे ५ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

   राष्ट्रीय स्तरावरील कुमारी अनुजा पाटील हिने द्वितीय तर कुमारी आकांक्षा पवार हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पब्लिकेशन्स डीन डॉ. संपत देशमुख, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, प्रा. समाधान माळी आदींच्या हस्ते कुमारी अनुजा पाटील आणि कुमारी आकांक्षा पवार आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.