पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये क्रीडादिन उत्साहात साजरा*

 *पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये क्रीडादिन उत्साहात साजरा*



पंढरपूर: प्रतिनिधि


कोटीं (ता.पंढरपूर) येथील सिंहगड पब्लिक मध्ये १४ वा क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र पवार (जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापूर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 त्यानंतर शाळेच्या विशिष्ट गणवेशात मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध तालामध्ये विद्यार्थ्यानी परेड सादर केली. यावेळी सिंहगड शाळेतील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी क्रीडाज्योतीची रॅली काढली. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मत व्यक्त करताना नरेंद्र पवार म्हणाले की, “सर्व शाळांनी व पालकांनी विद्यार्थ्याना त्यांच्या खेळ व कला गुणांना वाव देण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शाळेच्या विद्यार्थ्यानी योगा, मनोरे, अँरोबीक्स आदि सांघिक खेळ सादर केले.  

कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात शाळेअंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, इस्टेट मॅनेजर रोहन नवले आद उपस्थित होते. 

   या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार शाळेच्या प्राचार्य स्मिता नवले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका स्मिथा नायर स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad