पंढरपूर सिंहगड मध्ये "डेटा एनालिसिस अँड बिग डेटा" या विषयावर सेमिनार संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "डेटा एनालिसिस अँड बिग डेटा" या विषयावर सेमिनार संपन्न*




पंढरपूर: प्रतिनिधी


        एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आई.ई.टी.ई) यांच्या संयुक्त विद्यमाने व कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "डेटा एनालिसिस अँड बिग डेटा" या विषयावर शनिवार दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी सेमिनार आयोजित करण्यात आला. हा सेमिनार उत्साहात संपन्न झाला अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली. 




      या सेमिनार मध्ये डॉ. आरती खापर्डे यांनी सध्याच्या युगात डेटा एनालिसिसचे महत्व, डेटा सायन्स चे कार्य, गूगल कोल्याब मध्ये प्रोग्रामिंग कसे करायचे याविषयी प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवले.

   दरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाचा भाग म्हणून असे कार्यक्रम नेहमी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज आयोजित करत असते. यामधुन विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते असे मत डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.

       या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्गात शिक्षण घेत असलेल्या ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा.अंजली पिसे, प्रा.वैभव गोडसे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. स्वप्नील टाकळे, प्रा. गणेश बिराजदार व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रोहन कलुबर्मे यांनी जबाबदारी पार पाडली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.