सोलापूर ग्रामीण रोटरी कॉप्सची एकत्रित ताकत समाजासाठी उपयोगाची- रो नितीन कुदळे

 सोलापूर ग्रामीण रोटरी कॉप्सची एकत्रित ताकत समाजासाठी उपयोगाची-  रो नितीन कुदळे



पंढरपूर: प्रतिनिधी 


रोटरी क्लब ऑफ पंढरपूर रोटरी भवन येथे बुधवार दिनांक ७ जुन २०२३ रोजी सोलापूर ग्रामीण रोटरी कॉप्सची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये ९ सदस्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या बैठकीत बोलताना रो. नितिन कुदळे म्हणाले, सोलापूर ग्रामीण रोटरी कॉप्स ची एकत्रित ताकत समाजासाठी उपयोगाची असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी कॉप्सचे अध्यक्ष रो. यशवंत हांडे व सचिव रो नितीन कुदळे उपस्थित होते. रो. डाॅ. कैलाश करांडे व रो सचिन भिंगे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात रो हमीद शेख रो डॉ सुभाष पाटील रो जयंत हरिदास रो राजेंद्र केसकर रो प्रशांत कोल्हे रो रवींद्र बोबडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सर्व सोलापूर ग्रामीण मधील क्लब चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad