चौकी धर्मापुरी तालुका कंधार येथील ग्रामपंचायतीवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व.

 चौकी धर्मापुरी तालुका कंधार येथील ग्रामपंचायतीवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व.


कंधार ता.प्र.शिवराज पाटील इंगळे



दिनांक 1८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चौकी धर्मापुरी तालुका कंधार येथे श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज ग्रामविकास एकता पॅनलचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात दणदणीत विजय झाला. सरपंचासह सहा जागांवर विजयी झाला. पॅनलप्रमुख सुरेश पाटील इंगळे आनंदा वाघमारे गोविंद पाटील कळकेकर व सदाशिव पाटील इंगळे यांच्या नियोजनाखालि निवडणूक पार पडली. त्यात थेट जनतेच्या मनात असलेल्या सरपंच पदी सौ.अनुजा उमाकांत इंगळे व ग्रामपंचायत सदस्य म्हणून श्री. मधुकर बालाजी कळकेकर, सौ.मुद्रिकाबाई संतोष कळकेकर, सौ.शिलाबाई बालाजी कळकेकर,श्री.परमेश्वर गंगाधर गीते, सौ.कौशल्याबाई शिवाजी डुबुकवाड, व सुदाम भगवान वाघमारे विजयी झाले. निवडून आल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून राजकीय नेते मंडळी मित्रपरिवार व गावकरी व ग्राम स्तरावरुन सर्वांनी निवडून आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad