उपक्रमशील शिक्षक विशाल महाबळे डॉ.शंकरराव चव्हाण ज्ञानरत्न शिक्षक पुरस्काराने सन्मानित *नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*

उपक्रमशील शिक्षक विशाल महाबळे डॉ.शंकरराव चव्हाण ज्ञानरत्न शिक्षक पुरस्काराने सन्मानित
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* उपक्रमशील शिक्षक विशाल महाबळे यांना डॉ. शंकरराव चव्हाण ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक काँग्रेसच्या वतीने दिला जाणारा 2022 चा तालुकास्तरीय डॉ. शंकररावजी चव्हाण ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय जिल्हा परिषद शाळा निळा येथील सहशिक्षक विशाल मेघाजी महाबळे यांना त्यांच्या मात्यापित्यासह दिनांक 30 -9 -2022 रोजी संकुल स्तरीय शिक्षण परिषदेमध्ये जि .प .शाळा भाद्रा .ता. लोहा येथे आमदार मोहनअण्णा हंबर्डे तसेच मा. आमदार रोहिदास जी चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे मा .सभापती खुशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य श्रीनिवास मोरे ,लोहा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रवींद्रजी सोनटक्के, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांच्यासह पत्रकार बांधव बांधव तसेच जिल्हा परिषद शाळा भाद्रा, पांगरी, भाद्रातांडा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य गावकरी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष विठूभाऊ चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले . पुरस्कार प्रदान झाल्यानंतर सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले .तसेच त्यांच्या मित्र परिवारातून समाजमाध्यम तसेच प्रत्यक्षरीत्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.