ठरलं..तर... "श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी" हे अभिजीत पाटील यांच्या पॅनलचे नाव!*

 *ठरलं..तर... "श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी" हे अभिजीत पाटील यांच्या पॅनलचे नाव!* 



*("तो" कार्यकर्ता माझाच आहे:-अभिजित पाटील)*






 पंढरपुर तालूक्यातील उपरी येथे अभिजीत पाटील यांची जंगी सभा पार पडली. या सभेस उपरी गावातील व भाळवणी गटातील असंख्य शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



याप्रसंगी भालके-काळे गटातील अनेक शेतकरी सभासद व समर्थकांनी उद्योगपती अभिजीत पाटील गटामध्ये जाहीर प्रवेश करून पाठिंबा दिला.


यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्याच्या जडण घडणीतील अनेक पैलू आहेत. ज्याने जाब विचारला "तो" कार्यकर्ता माझाच आहे. ज्याने आयुष्यभर तुमच्यासाठी ओझी वाहली तुमच्यासाठी रक्ताचे पाणी केले त्याने नुसते विचारले म्हणून काय झाले विठ्ठल कारखान्याची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने लढली पाहिजे माझ्या कार्यकर्त्याला जर धक्का लागला तर सहन होणार नाही असे यावेळी अभिजीत पाटील यांनी भाषणात बोलताना सांगितले.




याप्रसंगी विठ्ठलच्या सर्व सभासदांच्या साक्षीने अभिजीत पाटील या गटाच्या पॅनलचे "श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी"पॅनल हे नाव घोषीत केले श्री विठ्ठल कारखान्याचे परिवर्तन करू,विकास करू आणि सर्वांची आघाडी करू असा विश्वास यावेळी अभिजीत पाटील यांनी समस्त शेतकरी सभासदांना दिला. याप्रसंगी विठ्ठल परिवाराचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व अभिजित पाटील यांच्यावर प्रेम करणारे सर्व सुज्ञ सभासद वर्ग या प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.