प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात दि. ८ जुलै पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन


प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात  


दि. ८ जुलै पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन



पंढरपूर:- ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या बारावी सायन्स नंतरच्या डी.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून गुरुवार, दि ०९ जुन, २०२२ पासून ते शुक्रवार, दि. ०८ जुलै, २०२२ अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.’ अशी माहिती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली.), पंढरपूरचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली.     


       बारावी सायन्स नंतर असलेल्या डी.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून गुरुवार, दि ०९ जुन, २०२२ पासून सुरवात झाली आहे. या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेनंतर गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर दि. ११ जुलै, २०२२ रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दि.१२ ते १४ जुलै या दरम्यान करता येईल. यानंतर दि. १५ जुलै रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांकडे आपल्या प्रवर्गानुसार योग्य ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, प्राचार्य प्रा.सतीश मांडवे व प्र.प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली या सुविधा केंद्राचे कामकाज सुरु आहे. याचा लाभ बारावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना डी.फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. पंढरपूर परिसर पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागणीनुसार सन २००६ साली कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली.) महाविद्यालय स्थापन झाले होते. शिस्त व संस्कार यासाठी प्रसिद्ध असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत देखील सातत्याने आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यातून हे महाविद्यालय पहिल्याच फेरीत फुल्ल होत असल्यामुळे या महाविद्यालयातच आपल्याही पाल्याला शिक्षण घ्यावे या हेतूने पालकांच्या मागणीला जोर चढल्यामुळे यावर सारासार विचार करून गेल्या वर्षी (२०२१) आणखी एका डी. फार्मसी या कोर्सची सुरवात कॉलेज ऑफ फार्मसी (डिग्री) महाविद्यालयात करण्यात आली. वार्षिक परीक्षांचे निकाल, वसतिगृहाची सुविधा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी असणारी ‘कमवा व शिका’ योजना, रात्र अभ्यासिका आदी विद्यार्थी पूरक सुविधांमुळे पालक व विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे ओढा वाढत आहे. डी. फार्मसीच्या प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.मुबीना मुजावर (मोबा.क्र.-९७६६१५९२९८) व डॉ.वृणाल मोरे (मोबाईल– ९६६५१९६६६६) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.