एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील एआयसीटीई आयडिया लॅबमध्ये बूटकॅम्प कार्यक्रमाचे उद्घाटन

 एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील एआयसीटीई आयडिया लॅबमध्ये बूटकॅम्प कार्यक्रमाचे उद्घाटन



पंढरपूर : एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील एआयसीटीई आयडिया लॅबच्या वतीने दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांसाठी आयोजित बूटकॅम्प कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शी, न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर तसेच स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील १५ पेक्षा अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.


या बूटकॅम्पचा मुख्य उद्देश प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन प्रक्रिया आणि विविध उपकरणांच्या प्रत्यक्ष वापराचे प्रशिक्षण देणे हा आहे. कार्यक्रमांतर्गत सहभागी प्राध्यापकांनी एआयसीटीई आयडिया लॅबमधील विविध अत्याधुनिक उपकरणांवर प्रत्यक्ष काम केले.


यामध्ये इको प्लॉटर मशीन, सीएनसी राउटर मशीन, सीओटू लेझर कटिंग मशीन, त्रिमितीय मुद्रण यंत्र (३डी प्रिंटर), लेथ मशीन, विनाइल कटर मशीन तसेच विविध इलेक्ट्रॉनिक मापन उपकरणांचा समावेश होता. सहभागी प्राध्यापकांनी या उपकरणांचा वापर करून विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली. डिझाइन, नमुना उत्पादन विकास, फॅब्रिकेशन आणि उत्पादन निर्मिती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच बाजारपेठेच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण व व्यावसायिक स्तरावर उपयुक्त उत्पादने विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


या उपक्रमामुळे प्राध्यापकांना आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण संशोधन, उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. अविनाश हराळे, प्रा. लक्ष्मीकांत जोशी, स्मिता पिसे आणि गणेश माळी यांनी कार्यक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीमध्ये मोलाचे योगदान दिले.


विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अभय गायकवाड, गार्गी गंधारे आणि शुभांगी लेंगरे यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.