एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वर्षा भोसले यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदी निवड.
पंढरपूर : प्रतिनिधी
एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची माजी विद्यार्थिनी कु. वर्षा भोसले हिची बृहन्मुंबई महानगरपालिकेत (MCGM) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावर निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, महाविद्यालय परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कु. वर्षा भोसले हिने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. प्रतिष्ठित बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने तिच्या व्यावसायिक कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक प्रगतीसह स्पर्धा परीक्षांद्वारे यश संपादन करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक कौशल्ये आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. वर्षा भोसले हिच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीची परंपरा अधिक अधोरेखित झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार, विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. वर्षा भोसले हिचे अभिनंदन केले असून, तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

