एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

 एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न



कोर्टी, पंढरपूर | दिनांक : २४ ऑक्टोबर २०२६


एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि पालक व महाविद्यालय यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे हा होता.


या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर काटेकर आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. ए. आय. निकम उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. व्ही. पवार यांनी केले. त्यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनातून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्यातील तांत्रिक कौशल्ये, संवादकौशल्ये, शिस्त, वेळेचे नियोजन आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली.


या मेळाव्यात पालक प्रतिनिधी म्हणून डॉ. संजय मुजमुले आणि श्री. मुरलीधर घुले यांनी सहभाग नोंदविला. पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसंदर्भात आपले विचार मांडले. अशा उपक्रमांमुळे पालकांना महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची प्रगती आणि उपलब्ध सुविधांची माहिती मिळण्यास मदत होते.


कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. शितल एस. देवकाते यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, पालक, प्राध्यापकवृंद आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.


पालक आणि महाविद्यालय यांच्यातील संवाद अधिक दृढ करणारा हा पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.