संशोधन प्रस्ताव लेखनावर विद्युत अभियांत्रिकी विभागात एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

 *संशोधन प्रस्ताव लेखनावर विद्युत अभियांत्रिकी विभागात एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न* 



पंढरपूर (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.के.एन. सिंघगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना (EESA) आणि आ य ई ई ई विद्यार्थी शाखा(IEEE student branch) एस.के.एन.एस.सी.ओ.ई.(SKNSCOE) कोर्टी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी “संशोधन प्रस्ताव लेखन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.


या कार्यशाळेसाठी एस.के.एन.एस.सी.ओ.ई.चे सहयोगी प्राध्यापक डॉ. बी. एस. गंधारे हे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रस्तावाची रचना, संशोधन विषयाची निवड, संशोधन समस्या मांडणी, संशोधनाची उद्दिष्टे निश्चित करणे, साहित्याचा आढावा, संशोधन पद्धती, अपेक्षित निष्कर्ष तसेच प्रभावी संशोधन प्रस्ताव लेखन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना संशोधन प्रस्ताव तयार करताना आवश्यक असणाऱ्या विविध बाबींचे उदाहरणे व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आले. संशोधन प्रस्ताव प्रभावी, शास्त्रीय आणि संशोधनाच्या दृष्टीने उपयुक्त पद्धतीने कसा तयार करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होण्यास तसेच भविष्यातील प्रकल्प, पेटंट आणि उच्च शिक्षणासाठी आवश्यक संशोधन कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली.


या कार्यक्रमाचे कार्यशाळा समन्वयक म्हणून प्रा. पी. बी. व्यवहारे यांनी नियोजन व समन्वय केला. कार्यक्रमाला डॉ. के. शिवशंकर आ य ई ई ई विद्यार्थी शाखा सल्लागार व विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख(IEEE Student Counselor and Senior member) डॉ. एस. जी. कुलकर्णी (उपप्राचार्य) तसेच डॉ. के. जे. करांडे (प्राचार्य, एस.के.एन.एस.सी.ओ.ई.) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


कार्यशाळेला विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. संशोधन प्रस्ताव लेखनातील बारकावे समजून घेण्यासाठी तसेच संशोधन क्षेत्रात प्रभावीपणे वाटचाल करण्यासाठी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.