मनू अलॉयज अँड कास्टिंग्ज प्रा. लि., सोलापूर येथे एस के एन सिंहगड कोर्टी पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
कोर्टी, पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाच्या (SY Mechanical Engineering) विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी मनू अलॉयज अँड कास्टिंग्ज प्रा. लि., सोलापूर येथे औद्योगिक भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
अभियांत्रिकी शिक्षणामध्ये केवळ वर्गखोलीतील सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियांचा अनुभव मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कास्टिंग प्रक्रिया, उत्पादन तंत्रज्ञान, औद्योगिक यंत्रसामग्री, फेरस व नॉन-फेरस कास्टिंग, गुणवत्ता नियंत्रण तसेच प्रत्यक्ष उत्पादन कार्यपद्धती यांची सविस्तर माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कास्टिंग उद्योगातील विविध उत्पादन टप्पे, कच्च्या मालाची हाताळणी, कास्टिंगची निर्मिती, आवश्यक उत्पादन प्रक्रिया, यंत्रसामग्रीचा वापर आणि गुणवत्ता तपासणी यांचा जवळून अभ्यास केला. तसेच उत्पादन प्रक्रियेमध्ये गुणवत्ता, अचूकता, सुरक्षितता आणि औद्योगिक मानकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले.
या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सैद्धांतिक संकल्पनांचा प्रत्यक्ष उद्योगातील वापर समजण्यास मदत झाली. कास्टिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील आधुनिक औद्योगिक पद्धतींबाबत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. तसेच उद्योगातील कार्यसंस्कृती, शिस्त, सुरक्षितता आणि व्यावसायिक कौशल्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
या औद्योगिक भेटीचे समन्वयक प्रा. ए. डी. जाधव सर व विभागातील इतर प्राध्यापक यांनी नियोजन व आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ही औद्योगिक भेट यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना “Learning Beyond the Classroom” या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून, अभियांत्रिकीतील सैद्धांतिक ज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती यांच्यातील दुवा अधिक दृढ झाला.

