एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘डीएसपी एप्लीकेशन इन वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

 एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘डीएसपी एप्लीकेशन इन वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.



पंढरपूर : प्रतिनिधी


कोर्टी, पंढरपूर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (IETE) यांच्या संयुक्त विद्यमाने “डीएसपी एप्लीकेशन्स इन वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती विभाग प्रमुख डॉ.अल्ताफ मुलाणी यांनी दिली. 


ही कार्यशाळा ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून तृतीय वर्ष बी.टेक. वर्गात आयोजित करण्यात आली. 


या कार्यशाळेसाठी डॉ. गणेश बिराजदार, सहाय्यक प्राध्यापक, डीवायपीसीओइ , आकुर्डी, पुणे( DYPCOE, Akurdi, Pune) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

कार्यशाळेमध्ये वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीममध्ये डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग (डीएसपी) च्या विविध अनुप्रयोगांबाबत विद्यार्थ्यांना तांत्रिक व व्यावहारिक मार्गदर्शन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञानातील डीएसपी च्या महत्त्वपूर्ण संकल्पना समजून घेण्याची संधी मिळाली. 


या कार्यशाळेसाठी प्रा. महेश झाडे यांनी समन्वयक म्हणून, तर प्राध्यापक वैभव गोडसे यांनी आईटीई (IETE) समन्वयक म्हणून कार्यभार स्वीकारला. विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 


प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या व यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. जस्विना पांढरे व कु. अपूर्वा कुलकर्णी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.