यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात गेट (GATE) व स्पर्धा परीक्षांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
पंढरपूर | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत तृतीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी गेट(GATE) व स्पर्धा परीक्षा” या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानासाठी प्रा. एन. एम. मोरकणे (एम.टेक. डिझाईन इंजिनिअरिंग) हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. अमित भादुले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचा सत्कार केला.
आपल्या मार्गदर्शनपर सत्रात प्रा. मोरकणे यांनी विद्यार्थ्यांना GATE परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, सातत्यपूर्ण तयारी, वेळेचे व्यवस्थापन, प्रश्न सोडविण्याच्या प्रभावी पद्धती तसेच कोअर इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध करिअर संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वासाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना गेट(GATE) व विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च शिक्षण आणि उत्तम करिअरच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय विभागीय गेट(GATE) समन्वयक प्रा. एल. डी. जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. ए. एस. आराध्ये यांनी आभार प्रदर्शन केले.
या तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना गेट(GATE) व विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य दिशा, अभ्यासाचे नियोजन, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला. विभागाच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण व स्पर्धात्मक करिअरच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

