कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; साहसी नृत्ये आणि 'हर घर तिरंगा' रॅलीने वेधले लक्ष

 कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; साहसी नृत्ये आणि 'हर घर तिरंगा' रॅलीने वेधले लक्ष



पंढरपूर:

 श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला पंढरपूर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ऋजुता उत्पात व नारायण उत्पात उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम उपस्थितांची दाद मिळवून गेले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी 

सांस्कृतिक व साहसी सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर प्रभावी नृत्ये सादर केली. तसेच, शारीरिक कौशल्ये आणि चपळाईचे दर्शन घडवणारे साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

'हर घर तिरंगा' रॅली: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रशालेतर्फे भव्य 'हर घर तिरंगा' रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.


यावेळी प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके, तुकाराम राऊत आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.