आमदार मुक्कामी आपल्या गावी उपक्रमांतर्गत आज आलेगाव खुर्द येथे आमदार अभिजीत आबा पाटील यांचा मुक्काम*

 *आमदार मुक्कामी आपल्या गावी उपक्रमांतर्गत आज आलेगाव खुर्द येथे आमदार अभिजीत आबा पाटील यांचा मुक्काम*



प्रतिनिधी/- दि. २१ ऑगस्ट २०२६ 


माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आमदार मुक्कामी आपल्या गावी या उपक्रमांतर्गत आज आलेगाव खुर्द येथे सायंकाळी ६वाजता आमदार अभिजीत पाटील यांचा मुक्काम आयोजीत करण्यात आला आहे.


या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या विविध समस्या, विकासकामे तसेच प्रलंबित प्रशासकीय प्रश्न जाणून घेऊन त्यावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात येणार आहे.


यावेळी गावातील महसूल, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, महसूल, ग्रामविकास, शासकीय योजना व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना व पाठपुरावा करण्याच्या सूचना आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहेत.


प्रशासन आपल्या दारी आणि आमदार आपल्या गावात या भावनेतून नागरिकांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, सर्व प्रशासकीय विभागांचा समन्वय साधून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


आलेगाव खुर्द परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध समस्या व मागण्या घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.