पंढरपूर सिंहगडच्या पाच विदयार्थ्यांची ॲक्वा चिल सिस्टिमस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ४ लाख पॅकेजची नोकरी

 पंढरपूर सिंहगडच्या पाच विदयार्थ्यांची ॲक्वा चिल सिस्टिमस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड


कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ४ लाख पॅकेजची नोकरी



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेला तपकिरी शेटफळ, ता.पंढरपूर येथील सचिन सिध्देश्वर सरगर, वाठार, ता.कराड येथील सोहेल बाळू खान, पंढरपूर येथील आकाश अरविंद चौगुले, इलेक्टीकल विभागातील पंढरपूर येथील चैत्राली योगेश देवळे व सौरभ सुनिल बागल ॲक्वा चिल सिस्टिमस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

ॲक्वा चिल सिस्टिमस प्रायव्हेट लिमिटेड ही औद्योगिक प्रोसेस कूलिंग, चिल्ड वॉटर सिस्टीम्स, व्हेंटिलेशन, आणि टर्नकी प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. कंपनी विविध उद्योगांसाठी ऊर्जा-कार्यक्षम शीतकर तापमान नियंत्रण उपाय उपलब्ध करून देते.


अशा या कंपनीत सचिन सरगर, सोहेल खान, आकाश चौगुले, चैत्राली देवळे, सौरभ बागल यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा, दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.