यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात ‘अपारंपारिक मशीनिंग’ विषयावर तज्ज्ञ व्याख्यान संपन्न

 यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात ‘अपारंपारिक मशीनिंग’ विषयावर तज्ज्ञ व्याख्यान संपन्न



पंढरपूर | प्रतिनिधी


सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत द्वितीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी ‘अपारंपारिक मशीनिंग’ या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले.या व्याख्यानासाठी एस.ए.जे. कन्सल्टन्सी, सोलापूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. एस. ए. जेऊरकर हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अपारंपारिक मशीनिंगच्या विविध आधुनिक प्रक्रियांची सविस्तर माहिती दिली. तसेच पारंपारिक मशीनिंगच्या मर्यादा, विविध अपारंपारिक मशीनिंग पद्धतींची कार्यपद्धती, त्यांचे फायदे, मर्यादा आणि औद्योगिक क्षेत्रातील उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.


विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीनिंग, इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग, अल्ट्रासोनिक मशीनिंग, लेझर बीम मशीनिंग यांसारख्या आधुनिक मशीनिंग प्रक्रियांची माहिती देण्यात आली. कठीण पदार्थांचे अचूक मशीनिंग, सूक्ष्म घटकांची निर्मिती आणि आधुनिक उत्पादन उद्योगातील या तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सैद्धांतिक संकल्पना आणि आधुनिक औद्योगिक उत्पादन तंत्रज्ञान यांचा संबंध समजून घेण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकाशी संवाद साधत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. धनंजय गिराम यांनी व्याख्यानाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.हा उपक्रम यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

या तज्ज्ञ व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात, औद्योगिक दृष्टिकोनात आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाविषयीच्या समजुतीत निश्चितच भर पडली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.