पंढरपूर सिंहगडमध्ये ‘पोस्टमन व सेलेनियम’द्वारे टेस्ट ऑटोमेशन कौशल्यविकासावर व्याख्यान संपन्न*

 *पंढरपूर सिंहगडमध्ये ‘पोस्टमन व सेलेनियम’द्वारे टेस्ट ऑटोमेशन कौशल्यविकासावर व्याख्यान संपन्न*



एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्ष बी.टेक.च्या विद्यार्थ्यांसाठी “बिल्डिंग टेस्ट ऑटोमेशन स्किल्स विथ पोस्टमन अँड सेलेनियम” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यान दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी ऑल्टिमेट्रिक लिमिटेड, येरवडा, पुणे येथील टेस्ट स्पेशालिस्ट डॉ. गणेश पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांनी प्रास्ताविक करताना सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि टेस्ट ऑटोमेशन कौशल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. उद्योग क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी तसेच त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या मार्गदर्शनामध्ये डॉ. गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना एपीआय टेस्टिंग टूल – पोस्टमनची अंमलबजावणी नमुना एपीआयच्या सहाय्याने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. तसेच सेलेनियम वेबड्रायव्हर आर्किटेक्चरची रचना व कार्यपद्धती स्पष्ट करून मेव्हनच्या सहाय्याने सेलेनियम सेटअप करून वेब ब्राउझर सुरू करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना सेलेनियममधील विविध वेबड्रायव्हर कमांड्स व नेव्हिगेशन कमांड्स यांचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच आयडी, नेम, एक्सपाथ आणि सीएसएस सिलेक्टर या विविध सेलेनियम लोकेटर्सचा वापर करून वेब एलिमेंट्स शोधणे आणि त्यावर विविध वेबएलिमेंट मेथड्सच्या सहाय्याने ऑपरेशन्स करण्याची पद्धत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आली.

डॉ. गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये ऑटोमेशनची वाढती गरज, उद्योग क्षेत्रातील संधी आणि पोस्टमन व सेलेनियमसारख्या साधनांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना एपीआय टेस्टिंग तसेच वेब ऑटोमेशन टेस्टिंग याविषयी व्यावहारिक ज्ञान मिळाले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एस. एस. भिमदे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. व्याख्यानास तृतीय वर्ष बी.टेक. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.