प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एमबीए प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु स्वेरीत हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध


प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एमबीए प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु

स्वेरीत हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध



पंढरपूरः 'प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) व एमबीए (पदव्युत्तर पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया गुरूवार, दि.०२ जुलै २०२६ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला स्क्रुटीनी सेंटर (एस.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. दोन्ही कोर्सेस साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया रविवार, दि.१२ जुलै २०२६ (सायं. ५.००) पर्यंत चालणार आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

         महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, मूळ कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि कन्फर्मेशन करणे आदी बाबींचा समावेश आहे. प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी व पदव्युत्तर पदवी असलेल्या एमबीए या दोन्हींच्या प्रवेशासाठीची ही प्रक्रिया गुरूवार, दि.०२ जुलै २०२६ पासून ते रविवार, दि.१२ जुलै २०२६ (सायं. ५.००) पर्यंत चालेल तर कागदपत्रे पडताळणी करून खात्री करणे यासाठी शुक्रवार, दि.०३ जुलै २०२६ पासून ते सोमवार, दि.१३ जुलै २०२५ (सायं.५.००) पर्यंत मुदत दिली आहे. रजिस्ट्रेशनसाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच स्वतःचा मोबाइल/नंबर सोबत असावा. ‘सदरची नोंदणी यशस्वीपणे आणि बिनचूकपणे केलेले विद्यार्थीच शासनाच्या कॅप राऊंडसाठी पात्र राहतील. सदर कॅप राऊंड मधून प्रवेशित विद्यार्थीच शासनाच्या वेगवेगळ्या सवलती घेण्यास पात्र राहतील. पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी बारावी सायन्स मधून उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यात गणित विषय आवश्यक आहे व गणित विषयाची सीईटी किंवा जेईई परीक्षा दिलेली असावी. एमबीएच्या प्रवेशासाठी कोणत्याही शाखेचा पदवी व सीईटी परीक्षा दिलेली असावी, हे बंधन कारक आहे. इंजिनिअरिंग (पदवी) व एमबीएच्या प्रवेशासाठी ही प्रवेश नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून सर्व विद्यार्थी व पालकांनी स्वेरीत येऊन ही प्रक्रिया येथील तज्ञ शिक्षकांमार्फत पूर्ण करून घ्यावी.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अधिष्ठाता प्रा. उत्तम अनुसे (मोबाईल क्र.-९१६८६५५३६५), प्रा. पोपट आसबे (७८२१००४६४७) व एमबीए करीता प्रा. सागर सरीक (९८९०४१९०४९) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.