राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी निवड कार्यक्रम उत्साहात

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी निवड कार्यक्रम उत्साहात 



 प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सातारा जिल्हा राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.



यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, बूथस्तरावर पक्षाची बांधणी, युवक व महिला सहभाग वाढविणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गावागावात पक्षाची भूमिका पोहोचवून जनसंपर्क वाढवावा आणि शेतकरी, युवक, महिला व कष्टकरी घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करावा, असे आवाहन करण्यात आले.


यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, "2029 मध्ये सत्ता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी आजपासूनच प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे. संघटना मजबूत करा, जनतेमध्ये जा आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवा. कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर 2029 मध्ये सत्ता आपलीच येणार," असा विश्वास व्यक्त केला.


यावेळी राज्याचे माजी सहकार मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष तसेच सातारा जिल्ह्याचे निरीक्षक श्री. नागेश फाटे, श्री. अभयसिंह जगताप, श्री. नितीन शिंदे, श्री. समीर घाटगे, श्री. साहिल बाबा शिंदे, सौ. अर्चनाताई देशमुख, श्री. प्रवीण घायके, श्री. गोरखनाथ नलावडे, शफिकभाई, ॲड. श्री. निलेश ढेरे, सरचिटणीस श्री. राजकुमार पाटील, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. तेजपाल वाघ, उद्योग व व्यापार विभागाचे उपाध्यक्ष श्री. पारिजात दळवी, सौ. सुमित्राताई यादव, सौ. संगीताताई साळुंखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली तसेच ह्या वेळी मोठ्या प्रमाणात नव्या कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश ही ह्या वेळी झाले व पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पक्ष संघटना अधिक बळकट करून आगामी काळात जनहिताच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.