'हँड्स-ऑन तायफून एचआयएल सिम्युलेशन फॉर हाय-इम्पॅक्ट रिसर्च' या व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राम कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

 'हँड्स-ऑन तायफून एचआयएल सिम्युलेशन फॉर हाय-इम्पॅक्ट रिसर्च' या व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राम कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद



एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग, आय ई ई ई स्टुडंट ब्रँच एस के एन एस सी ओ ई कोर्टी आणि आय ई ई ई महाराष्ट्र सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने 'हँड्स-ऑन तायफून एचआयएल सिम्युलेशन फॉर हाय-इम्पॅक्ट रिसर्च' हा चार दिवसीय व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. आय ई ई ई डब्ल्यू आय ई डे सेलिब्रेशन २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तायफून एचआयएल, रिअल-टाइम सिम्युलेशन तसेच आधुनिक पॉवर सिस्टीम ॲप्लिकेशन्स यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विमेन इन इंजिनिअरिंग (डब्ल्यूआयई) या संकल्पनेला अनुसरून सर्वसमावेशक शिक्षण, तांत्रिक उत्कृष्टता आणि महिला अभियंत्यांना संशोधन, नवोपक्रम तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देण्यात आले.



या कार्यक्रमातील तांत्रिक सत्रांचे मार्गदर्शन डॉ. के. शिवशंकर, विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी विभाग, आय ई ई ई सिनियर मेंबर तसेच आय ई ई ई स्टुडंट ब्रँच काउन्सेलर यांनी केले. त्यांनी हार्डवेअर-इन-द-लूप (एचआयएल) सिम्युलेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कन्व्हर्टर्सचे रिअल-टाइम मॉडेलिंग आणि आधुनिक पॉवर सिस्टीम ॲप्लिकेशन्स यांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच तायफून एचआयएल प्लॅटफॉर्मचा वापर करून रिअल-टाइम सिम्युलेशन मॉडेल्सची निर्मिती, चाचणी आणि प्रमाणीकरण याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.


या कार्यक्रमामध्ये मिनी प्रोजेक्ट आणि रिसर्च पेपर तयार करण्यावरही विशेष भर देण्यात आला. सिम्युलेशन-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी प्रकल्प व संशोधन कार्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष सत्रांमुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, विश्लेषणात्मक कौशल्ये आणि उद्योगाभिमुख सिम्युलेशन तंत्रज्ञानाविषयीची समज अधिक दृढ झाली.


या कार्यक्रमाचे समन्वयक श्री. के. पी. जाधव, सौ. एस. डी. घोडके आणि सौ. ए. ए. चांदणे यांनी प्रभावीपणे काम पाहिले. तसेच कु. अनघा कुलकर्णी, अध्यक्षा, आय ई ई ई स्टुडंट ब्रँच एस के एन एस सी ओ ई कोर्टी आणि कु. सायली बागल, अध्यक्षा, आय ई ई ई डब्ल्यू आय ई अफिनिटी ग्रुप एस के एन एस सी ओ ई कोर्टी यांनी कार्यक्रमाच्या नियोजन व यशस्वी अंमलबजावणीसाठी मोलाचे योगदान दिले. चारही दिवस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा लाभ घेतला.


हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहन व सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागाने डॉ. के. शिवशंकर, आयोजन समिती, आय ई ई ई स्टुडंट ब्रँच एस के एन एस सी ओ ई कोर्टी, आय ई ई ई महाराष्ट्र सेक्शन, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सिम्युलेशन तंत्रज्ञानाची ओळख होऊन संशोधनाभिमुख दृष्टीकोन विकसित करण्यास मोठी मदत झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.