पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची मायक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये निवड वार्षिक ५.५ लाख पॅकेजची नोकरी

 पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची मायक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये निवड

वार्षिक ५.५ लाख पॅकेजची नोकरी



पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेला कुर्डूवाडी येथील यशराज सिध्देश्वर गवळी आणि पंढरपूर येथील मोहम्मदबाशित बशीर शेख यांची मायक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असून त्यांना वार्षिक ५.५ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती मेकॅनिकल विभाागाचे विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी दिली.

मायक्रॉन टेक्नॉलॉजी ही संगणक मेमरी आणि डेटा स्टोरेज बनवणारी जगातील अग्रगण्य अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९७८ मध्ये अमेरिका या देशात झाली आहे. ही कंपनी प्रामुख्याने सेमीकंडक्टर क्षेत्रात काम करते भारतासाठी मायक्रॉन टेक्नॉलॉजी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कंपनीने भारताच्या सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत गुजरातमध्ये (सानंद येथे) आपला पहिला मोठा 'सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्लँट' उभारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भारतात हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होत आहेत आणि देशांतर्गत चिप निर्मितीला मोठी चालना मिळत आहे.

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी अत्यंत पद्धतशीर आणि प्रभावी उपक्रम राबवले जातात. यामध्ये प्रामुख्याने 'स्टुडंट ट्रेनिंग प्रोग्राम' अंतर्गत पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर काम केले जाते. प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांसाठी नियमित अ‍ॅप्टिट्युड आणि रिझनिंग टेस्ट, मॉक इंटरव्ह्यू, र्व्हच्यूअल कॅम्पस डाइव्ह आणि ग्रुप डिस्कशन यांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. यासोबतच, कोडिंग बूटकॅम्प्स, तांत्रिक कार्यशाळा आणि 'रुबिकॉन', महिंद्रा नांदी फाऊंडेशन, जीटीटी यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्याने सॉफ्ट स्किल्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. जागतिक स्तरावर संधी मिळावी म्हणून कॉलेजमध्ये पहिल्या वर्षापासूनच जपानी भाषेचे विशेष वर्ग चालवले जातात. या सर्वसमावेशक ट्रेनिंग आणि सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या भक्कम पाठिंब्यामुळे दरवर्षी १५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमध्ये पंढरपूर सिंहगडचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर नोकरी मिळवतात. 

अशा या कंपनीत यशराज गवळी, मोहम्मदबाशित शेख यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.