आषाढी वारी 2026: पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पंढरपुरातील दर्शन रांग व मंदिर परिसराची पाहणी * पंढरपूर शहरातील सुविधांची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी बुलेटवर फिरून केली

 आषाढी वारी 2026: पालकमंत्री जयकुमार गोरे यांची

पंढरपुरातील दर्शन रांग व मंदिर परिसराची पाहणी


* पंढरपूर शहरातील सुविधांची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी बुलेटवर फिरून केली



*मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत अन्नाचे वाटप पालकमंत्री गोरे यांनी भाविकांना केले


*व्हीआयपी दर्शन बंद झाल्याने भाविकांना ताटकळत उभे राहण्याचे सात ते आठ तास झाले कमी.


 *भाविकांशी साधला संवाद; स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश  


  पंढरपूर, दि. १८: आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथील पत्रा शेडजवळील रिद्धी-सिद्धी दर्शन रांग, वाळवंट, मंदिर परिसर व भक्तीसागर या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आत्तापासूनच व्हायला सुरुवात झाली आहे. गर्दीमध्ये व्हीआयपी वाहनांचा ताफा नको , म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेट वरून पाहणी केली.


     यावेळी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी पालकमंत्री गोरे यांनी संवाद साधला व प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांविषयी विचारपूस केली. दर्शन रांगेतील भाविकांनी प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.  


     पालकमंत्री गोरे म्हणाले, गेल्या दीड महिन्यांपासून प्रशासनाने आषाढी वारीनिमित्त भाविकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. केलेल्या कामाबद्दल आपण समाधानी असून येथे येणाऱ्या वारकरी-भाविकांचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 

स्वच्छतेवर भर:  

 पालकमंत्र्यांनी दर्शन रांगेतील भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या व्यवस्थेची पाहणी केली. शौचालयाची स्वच्छता नियमित राखण्याबाबत त्यांनी मुख्याधिकारी रोकडे यांना निर्देश दिले. तसेच वाळवंट व भक्तीसागर परिसराची पाहणी करून या ठिकाणी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना आवश्यक सूचना दिल्या.  


आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे सात ते आठ तास भाविकांना ताटकळत उभे राहण्याचा वेळ कमी झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.


पालकमंत्री जयकुमार गोरे हे शासकीय विश्रामगृह ते पत्रा शेड येथील दर्शन रांगेपर्यंत स्वतः बुलेट घेऊन दर्शन रांगेच्या पाहणीसाठी आले, पाठीमागे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन होते. तर दर्शन रांग ते वळवंट परिसरापर्यंत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुलेट घेतली


पालकमंत्र्याकडून दर्शन रांगेतील भाविकांना तांदळाच्या खिचडीचे वाटप- 

       श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी मोफत अन्न दानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आज पालकमंत्री जयकुमार गोरे हे दर्शन रांगेची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी स्वतः दर्शन रांगेतील भाविकांना तांदळाच्या ‍ खिचडीचे वाटप केले. 


यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह संबंधित ठिकाणचे स्थानिक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.  

                                                                     0000000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.