गादेगाव ते गव्हाणे वस्ती रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी; खा. प्रणिती शिंदे यांना साकडे**

 **गादेगाव ते गव्हाणे वस्ती रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी; खा. प्रणिती शिंदे यांना साकडे**



**सोलापूर:** सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील गादेगाव ते गव्हाणे वस्ती (ग्रा.मा. १०७) या सहा किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश एकनाथ फाटे यांनी सोलापूरच्या खासदार मा. प्रणिती शिंदे यांच्याकडे केली आहे.


 गादेगावची लोकसंख्या सुमारे १२,००० आहे. १० वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला हा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना रस्ता समजणे कठीण होते, ज्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले आहेत.

ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता, खासदार निधीतून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी नागेश फाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.