सिंहगड कॉलेजमध्ये ‘डेटा सायन्स व मशीन लर्निंगची मूलतत्वे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात

 *सिंहगड कॉलेजमध्ये ‘डेटा सायन्स व मशीन लर्निंगची मूलतत्वे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात*



पंढरपूर | प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी-पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग तसेच आयईईई विद्यार्थी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने “डेटा सायन्स व मशीन लर्निंगची मूलतत्त्वे” या विषयावर दि. ६ मार्च २०२६ रोजी एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनायक जगताप (सहाय्यक प्राध्यापक, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी–पंढरपूर) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना डेटा सायन्स व मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना, माहिती विश्लेषण प्रक्रिया, माहितीची पूर्वतयारी, माहितीचे दृश्य सादरीकरण तसेच मशीन लर्निंगमधील विविध गणनपद्धतींची मूलतत्त्वे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच आजच्या औद्योगिक व संशोधन क्षेत्रात डेटा सायन्सचे वाढते महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील भविष्यातील संधींबाबत माहिती दिली. डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगचा वापर ऑनलाईन खरेदी, बँकिंग व्यवहार, आरोग्य तपासणी, हवामान अंदाज, चेहरा ओळख प्रणाली तसेच स्वयंचलित वाहने अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. प्रदीप बी. व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. के. शिवशंकर (आयईईई विद्यार्थी शाखा सल्लागार व विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख), तसेच प्राचार्य डॉ. के. जे. करांडे व   उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी  यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या कार्यशाळेला विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डेटा सायन्स व मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना, त्यांचा प्रत्यक्ष वापर तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ही कार्यशाळा यशस्वी होणेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad