पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये “ॲप्लीकेशनस अँड टेस्टींग ऑफ एसी मोटर्स” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

 *पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये “ॲप्लीकेशनस अँड टेस्टींग ऑफ एसी मोटर्स” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न*



पंढरपूर :

सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाअंतर्गत “ॲप्लीकेशनस अँड टेस्टींग ऑफ एसी मोटर्स ” या विषयावर दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा आयईईई स्टुडंट ब्रँच, एसकेएनएससीओई, पंढरपूर तसेच आयईईई महाराष्ट्र सेक्शन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता उद्घाटन व स्वागत समारंभाने झाली. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून सम्राट इलेक्ट्रिकल्स अँड कॉन्ट्रॅक्टर्सचे प्रोप्रायटर श्री. अविनाश अनिल सुर्यगण उपस्थित होते. त्यांनी एसी मोटर्सचे औद्योगिक क्षेत्रातील विविध उपयोग, चाचणी पद्धती, दोष शोध प्रक्रिया व प्रतिबंधात्मक देखभाल याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

एसी (अल्टरनेटींग करंट ) मोटर्स या औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या विद्युत यंत्रांपैकी एक असून त्यांचे मुख्य प्रकार सिंगल फेज व थ्री फेज असे आहेत; औद्योगिक वापरासाठी प्रामुख्याने थ्री फेज इंडक्शन मोटर्सचा उपयोग केला जातो. उच्च कार्यक्षमता, मजबूत रचना, कमी देखभाल खर्च व दीर्घ आयुष्य या गुणधर्मांमुळे या मोटर्सचा वापर उत्पादन उद्योगातील कन्वेयर सिस्टीम, पंपिंग स्टेशन व जलपुरवठा व्यवस्था, कॉम्प्रेसर व ब्लोअर, लिफ्ट, क्रेन, मटेरियल हँडलिंग सिस्टीम, एचव्हीएसी प्रणाली तसेच कृषी पंपसेटमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. मोटरची सुरक्षितता व कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट (मेगरच्या साहाय्याने इन्सुलेशन तपासणी), नो-लोड टेस्ट (भाराविना करंट व कार्यक्षमता तपासणी), लोड टेस्ट (प्रत्यक्ष भाराखाली आउटपुट व तापमान तपासणी), हाय व्होल्टेज टेस्ट, वायब्रेशन अॅनालिसिस तसेच तापमान मोजणी व थर्मल मॉनिटरिंग अशा विविध चाचण्या केल्या जातात. ओव्हरहिटिंग, अनियमित आवाज, कमी टॉर्क, जास्त करंट ड्रॉ व वाइंडिंग बर्नआउट हे सामान्य दोष असून नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक देखभालीद्वारे हे दोष टाळून मोटरचे आयुष्य व कार्यक्षमता वाढवता येते.

ही कार्यशाळा द्वितीय वर्ष बी.टेक. विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवावर आधारित ज्ञान मिळाल्याने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. कार्यक्रम संवादात्मक स्वरूपाचा असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विभागप्रमुख व आयईईई स्टुडंट ब्रँच काउन्सिलर डॉ. के. शिवशंकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच प्राचार्य डॉ. के. जे. करांडे व उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी विभागाच्या सातत्यपूर्ण तांत्रिक उपक्रमांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून मोलाचे योगदान दिले. प्रयोगशाळा व्यवस्था, उपकरणांची मांडणी व तांत्रिक सहाय्य यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. के. पी. जाधव असून श्री. एम. आर. खडतरे यांनी विशेष सहकार्य केले. शेवटी प्रा. के. पी. जाधव यांनी प्रमुख वक्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad