*एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची डीआरडीओमध्ये निवड*
पंढरपूर | प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी श्री. कल्ली गुरुराज कल्लप्पा यांची भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या (डीआरडीओ) या देशातील प्रतिष्ठित संरक्षण संशोधन संस्थेच्या ‘अंतिम प्रक्षेपिकी संशोधन प्रयोगशाळा’ (टीबीआरएल), रामगढ येथे सशुल्क औद्योगिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
ही निवड डीआरडीओच्या औद्योगिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत झाली असून, सदर प्रशिक्षण कालावधी ६ फेब्रुवारी २०२६ ते ५ ऑगस्ट २०२६ असा सहा महिन्यांचा आहे. या कालावधीत विद्यार्थ्याला संरक्षण क्षेत्रातील संशोधन कार्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक अनुप्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
देशातील सर्वोच्च संरक्षण संशोधन संस्थेमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते. श्री. कल्ली गुरुराज कल्लप्पा यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक कौशल्ये आणि सातत्यपूर्ण परिश्रमांचे हे फलित असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची तसेच उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्याच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही हे प्रेरणादायी ठरत आहे.

