एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एनबीए आणि ओबीई विषयक पाच दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम यशस्वी*

 *एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एनबीए आणि ओबीई विषयक पाच दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम यशस्वी*



पंढरपूर (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी-पंढरपूर येथे “नवीन एनबीए मानांकन जीएपीसी 4.0 आणि परिणाम-आधारित शिक्षण (ओबीई) अंमलबजावणी” या विषयावर २७ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान पाच दिवसांचा प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्राध्यापकांना एनबीए मानांकन जीएपीसी 4.0 चे नवीन निकष, परिणाम-आधारित शिक्षण (ओबीई), कोर्स आउटकम आणि प्रोग्राम आउटकम यांचे नकाशांकन, उपलब्धता गणना तसेच सतत गुणवत्तावाढ या संकल्पनांची सखोल माहिती देणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सक्षम करणे हा होता.

कार्यक्रमादरम्यान एनबीएच्या सर्व निकषांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. डॉ. एस. एस. कुलकर्णी, डॉ. ए. आय. निकम, डॉ. ए. ओ. मुलाणी, डॉ. एस. व्ही. पिंगळे, डॉ. एस. एस. कदम आणि डॉ. कोंडूरू शिवशंकर यांनी मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला. त्यांनी अनुभवाधारित उदाहरणांद्वारे ओबीई अंमलबजावणीची प्रक्रिया स्पष्ट केली.

या कार्यक्रमात दृष्टी-धोरण (व्हीजन-मीशन ), प्रोग्राम उद्दिष्टे, प्रोग्राम आउटकम, शाखा विशेष आउटकम आणि कोर्स आउटकम मांडणी, नकाशांकन, मूल्यमापन निकष तयार करणे, स्व-आकलन अहवाल तयार करणे तसेच व्यावहारिक सत्र घेतले गेले. विविध विभागांतील ९० हून अधिक प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

समारोप सत्रात प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी आयोजक व मार्गदर्शकांचे अभिनंदन करत या कार्यक्रमामुळे महाविद्यालयाची एनबीए मानांकनासाठीची तयारी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

हा उपक्रम संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक उत्कृष्टता आणि ओबीई या ध्येयपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad